मुंबई : शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री यांच्यासह अनेक सेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा आज सहावा दिवस असून, अद्याप यावर काही तोडगा निघालेला नाही.
दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट करत बंडखोरांवर टीका केला आहे. ‘कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा.. चौपाटी मे.. ’अशी खोचक टीका राऊतांनी बंडखोरांवर केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदारांनी बंडखोरी केल्याने सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तवाणाचे वातावरण आहे. एकनाथ शिंदे गट भाजप गेले तर राज्यात सत्तापालट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी शिवसेना मात्र, स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील शिवसेना भवनात बैठकीचे सत्र सुरू आहे. तिकडे शिंदे गट देखील गेल्या सहा दिवसांपासून गुवाहाटी तळ ठोकून बसल्याने त्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे.
ट्विटसोबत झिरवाळांचा फोटो
संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की, ‘कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा.. चौपाटी मे..’ त्यासोबतच राऊतांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटो देखील पोस्ट केले आहे. फोटोत नरहरी झिरवाळ कमरेवर हात ठेवलेले दिसत आहे. कधीपर्यंत गुवाहाटीत लपून बसणार आहात, चौपाटीवर म्हणजे मुंबईला यावेच लागेल, असा इशारा राऊतांनी बंडखोरांना दिला आहे.