22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रकिती नर आणि किती मादी डास सापडले? भुजबळांकडून आरोग्यमंत्र्यांची फिरकी

किती नर आणि किती मादी डास सापडले? भुजबळांकडून आरोग्यमंत्र्यांची फिरकी

एकमत ऑनलाईन

मुंबई : डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले? यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत? असे प्रश्न करत छगन भुजबळ यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची चांगलीच फिरकी घेतली.

तत्पूर्वी सभागृहात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पहिल्याच दिवशी दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले होते. अजित पवारांनी प्रश्नांची सरबत्ती करुन सावंतांना दुस-या दिवशी अडचणीत आणले होते. आज तिस-या दिवशी छगन भुजबळांनी आरोग्यमंत्र्यांची फिरकी घेतली. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली? या प्रश्नावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले आणि डास घनता काढली असे उत्तर दिले होते.

यावर प्रश्न विचारताना छगन भुजबळ यांनी एकूण किती डास पकडले? डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले? यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत? डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का..? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का? असे प्रश्न विचारत आरोग्यमंत्र्यांची फिरकी घेतली. तानाजी सावंत यांनी यावर उत्तर देताना याचा सविस्तर अहवाल टेबल केला जाईल, असे म्हटले.

दुस-या दिवशीही आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली होती. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नव्हते. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला होता.

अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचा-यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना विचारली होती. ही माहिती आरोग्यमंर्त्यांकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नव्हते आणि प्रश्न उत्तरासाठी सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला होता. याचं उत्तर आज सावंतांनी दिले.

डीईसी गोळीला बंदी नाही – सावंत
तानाजी सावंत यांनी सांगितलं की, पालघर जिल्हात ३१ पदे रिक्त आहेत. २०२१ ला निधी प्राप्त झाला, मात्र खर्च झालेला नाही. पालघरमध्ये ९७ टक्के खर्च झाला आहे. यावर रविंद्र वायकर यांनी प्रश्न केला की, डीईसी गोळीला सरकारने बंदी घातली आहे. तरीही गोळी का दिली जात आहे. याची माहिती मिळावी. याला उत्तर देताना सावंत म्हणाले की, डीईसी गोळी दिली जाते. या गोळीवर बंदी नाही. हत्ती रोग संदर्भात पालघर जिल्हात जाणीवजागृती केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या