23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयव्हॉटसअ‍ॅप कॉलिंगला मोजावे लागणार पैसे?

व्हॉटसअ‍ॅप कॉलिंगला मोजावे लागणार पैसे?

एकमत ऑनलाईन

कॉलिंग, मेसेजिंग अ‍ॅप्स आता दूरसंचार कायद्याच्या कक्षेत!
नवी दिल्ली : डिजिटल माध्यमात व्हॉट्सअप हे अ‍ॅप सर्वाधिक वापरले जाते. अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. पण आता जर तुम्ही याच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधत असाल किंवा मेसेज करत असाल तर यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागू शकतात. कारण केंद्र सरकार लवकरच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, गुगल डुओ आणि टेलिग्रामसारख्या कॉलिंग आणि मेसेजिंग अ‍ॅप्सना दूरसंचार कायद्याच्या कक्षेत आणण्याची तयारी करत आहे. याबाबत सरकारने विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. त्यानुसार ओव्हर द टॉप म्हणजे इंटरनेटच्या मदतीने काम करणा-या अशा सेवा दूरसंचार कायद्याच्या कक्षेत येतील.

देशातील दूरसंचार कंपन्या सातत्याने तक्रार करत आहेत की, व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना मेसेजिंग आणि कॉलिंग सेवा दिली जाते, ज्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. या दूरसंचार कंपन्या त्यांच्या सेवा दूरसंचार सेवेअंतर्गत येत असल्याचे सांगतात. मीडिया रिपोर्टसनुसार केंद्र सरकारने ड्राफ्ट टेलिकम्युनिकेशन बिल २०२२ मध्ये असे अनेक प्रस्ताव आणले आहेत. या इंटरनेटवर आधारित सेवा म्हणजेच कॉलिंग आणि मेसेजिंग सेवा दूरसंचार कायद्याच्या कक्षेत आल्यानंतर याचा थेट परिणाम मोबाईल आणि इंटरनेट यूजर्सच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.

या विधेयकाच्या मसुद्याबाबत दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाल्या की, नवीन दूरसंचार विधेयकाबरोबरच उद्योगाची पुनर्रचना आणि नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारण्याचा रोडमॅप तयार केला जाईल. २० ऑक्टोबरपर्यंत सरकारने या मसुद्यावर उद्योग आणि लोकांकडून सूचना मागवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या