26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeमहाराष्ट्रनिवडणूक आयोगाला एवढी कसली घाई होती..

निवडणूक आयोगाला एवढी कसली घाई होती..

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटात शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले. सोबतच एकनाथ शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला शिवसेना नावही वापरता येणार नाही. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाला एवढी काय घाई होती की, चोवीस तासांत निर्णय घेण्यात आला अशी खोचक प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, हा निर्णय निवडणूक आयोगाने कोणत्या दबावाखाली घेतला आहे. गल्लीतील लहान मुलगाही सांगेल की, हा निर्णय दबावाखाली घेण्यात आला आहे. त्यामुळे हाच शिंदे गटाचा अट्टाहास होता का? हा भाजपचा कुटील डाव आहे. त्यांना कुठलाही राजकीय पक्ष नको आहे, असेही अंबादास दानवे म्हणाले. जनता आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून त्यांच्या नेतृत्वावर प्रत्येक शिवसैनिकाला विश्वास असल्याचे दानवे म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या निकालावर अंबादास दानवे यांनी फेसबुकवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात, आता कदाचित ना पक्षाचे नाव असेल ना चिन्ह सोबत आहे. फक्त ‘ठाकरे’ नावाचा पुण्यसंचय आणि सत्कर्म….कायदेशीर लढाया सुरूच राहतील. मात्र आमच्या पूर्वाश्रमीच्या मित्राने कितीही आपटली तरी ‘ठाकरे’ नावाचे वलय काढून घेण्यास त्यांना अजून अनेक जन्म घ्यावे लागतील, असे दानवे म्हणाले…

बस नाम ही काफÞी है, उद्धव बाळासाहेब ठाकरे….
सोबतच दानवे यांनी आणखी एक पोस्ट करत म्हटले आहे की, प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेबांना विचारले, बाळ, व्याख्याने, भाषणात असे सगळे तुझे सुरू आहे. हे सारे असेच चालू ठेवणार, की त्यास काही संघटित स्वरूप देणार?… हा विद्रोह संघटित व्हायला हवा आणि त्यातून जन्म झाला लोकांच्या संघटनेचा.. जन्म झाला शिवसेनेचा!… मराठी माणसाच्या वेदनेतून निर्माण झालेल्या संवेदनांचा सत्याविष्कार म्हणजे ‘शिवसेना’…निष्ठावंत शिवसैनिकांची संघटना म्हणजे ‘शिवसेना’.. या संघटनेचे चिन्ह आणि नाव गोठवले जाणे हे दु:ख खूप मोठे आहे. एकनाथ शिंदे तुम्हाला सामान्य शिवसैनिक कधीच माफ करू शकणार नाही, गद्दार…

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या