25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeहम तो डुबेंगे सनम लेकिन... एकनाथ खडसेंचा महाजनांना थेट इशारा

हम तो डुबेंगे सनम लेकिन… एकनाथ खडसेंचा महाजनांना थेट इशारा

एकमत ऑनलाईन

मुक्ताईनगर : ‘कोणी म्हणते नाथाभाऊ तुरुंगात जाईल. जायचंय, तुरुंगात जाईल. मात्र माझे एक वाक्य लक्षात ठेवा ‘हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे’ असे म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे नाव न घेता कडक इशारा दिला.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर जळगावमध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत यांच्यानंतर पुढचा नंबर हा एकनाथ खडसे यांचा असणार आहे, असा दावाच महाजनांनी केला होता. आज त्यांच्या या दाव्याला खडसेंनी आपल्या शैलीत उत्तर दिले.

ईडी नावाचा प्रकार आता घरोघरी पोहोचला आहे. माझ्यामागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन लागलं. असेल नसेल ते लागलं.. काय झालं काहीच नाही. विरोधकांना उठले की फक्त नाथाभाऊच दिसतो. कोणी म्हणते नाथाभाऊ तुरुंगात जाईल, जायचंय तर तुरुंगात जाईल. मात्र माझं एक वाक्य लक्षात ठेवा ‘हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे’ असे म्हणत खडसेंनी महाजनांवर जोरदार पलटवार केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या