या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये, पश्चिम मिदनापूर, साऊथ आणि नॉर्थ २४ परगणा, हावडा, हुगळी आणि कोलकाता या जिल्ह्यांमध्ये, तर ओदिशात, जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक, जजपूर आणि बालासोर या जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान होण्याचा इशारा, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी सर्तकता घेण्यात येत आहे. अम्फान या वादळाच्या रौदरुपाला तोंड देण्यासाठी एनडीआर एफच्या ४१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काल केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते.
Read More येत्या 12 तासांत चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता
अम्फानचं केंद्र पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीत होतं, जे पारादीप (ओदिशा) पासून सुमारे 420 किलोमीटर दक्षिण, दीघापासून 570 किलोमीटर दक्षिण-दक्षिण पश्चिम आणि बांगलादेशच्या खेपुपारापासून 700 किलोमीटर दक्षिण-दक्षिण पश्चिम भागात आहे, अशी माहिती भुवनेश्वर हवामान केंद्राचे संचालक एच आर विश्वास यांनी मंगळवारी सकाळी दिली होती.
चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणाऱ्या भागात रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुविधा तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारने २१ मेपर्यंत श्रमिक रेल्वे सेवा स्थगित केली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा या ठिकाणी मजुरांना घेऊन या श्रमिक रेल्वे जाणार होत्या. त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत, असे महाराष्ट्र सरकारकडून कळविण्यात आले आहे.
अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये आतापर्यंत एनडीआरएफची एकूण 41 पथकं तैनात करण्यात आली आहेत. एनडीआरएफचे प्रमुख एस.एन. प्रधान यांनी मंगळवार (19 मे) नवी दिल्लीत सांगितलं की, ” अम्फान चक्रीवादळाच्या रुपात हे दुसरं संकट आहे. कारण आपण आधीच कोरोना व्हायरसचा सामन करत आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. अम्फान मुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जास्त नुकसान होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या एकूण 41 पथकं तैनात करण्यात आली आहे.”
Read More रेडझोनमधून आलेल्यांना क्वारंन्टाईन करून सुविधा द्याव्यात
ओडिसाच्या सात जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची 15 पथकं तैनात करण्यात आली आहे. तर पाच पथकं तयारी ठेवली आहेत. पश्चिम बंगालच्या सहा जिल्ह्यात 19 पथकं तैनात असून दोन पथकं तयार ठेवली आहेत. अम्फान 20 मे रोजी धडकेल त्यावेळी जास्त नुकसान होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार तयारी करण्यात आली आहे, असं एस एन प्रधान यांनी सांगितलं.