37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीय'निसर्ग' चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकले; चबारा तासांमध्ये अजून तीव्र होणार

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकले; चबारा तासांमध्ये अजून तीव्र होणार

एकमत ऑनलाईन

अखेर त्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर

मुंबई :  ‘निसर्ग’ चक्रीवादळाबाबत वेधशाळेच्या सुधारीत अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून दुपारी त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल. दरम्यान, हे ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकत आहे.

Read More  रेल्वेत एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू नाही!

सुरवातीला हे वादळ हरिहरेश्वर जवळ धडकण्याची शक्यता होती. मात्र, संध्याकाळपर्यंत यात बदल होऊन ते अलिबागच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

चक्रीवादळ आगामी बारा तासांमध्ये अजून तीव्र होणार

जो कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात होता, त्याचे आता चक्रीवादळात रुपांतर झाले असून हे चक्रीवादळ आगामी बारा तासांमध्ये अजून तीव्र होणार आहे. तेथील वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमी एवढा असेल. १२० पर्यंत देखील तो पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याच्या मुंबईच्या दक्षता अधिकारी शुभांगी भुते यांनी दिली आहे. भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईपासून ४३० किमी दूर तर गोव्यापासून २८० किमी दूर हे चक्रीवादळ आहे. हे चक्रीवादळ ३ जूनच्या दुपारपासून दमण आणि हरिहरेश्वरपासून अलिबागच्याजवळ रायगड जिल्हा ओलांडण्याची शक्यता आहे. या तीव्र चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगडमधील काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यावेळी वाऱ्यांचा वेग हा ताशी १०० ते ११० किमी असेल. हे चक्रीवादळ या भागातून ज्यावेळी जाईल तेव्हा संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या