राजस्थानमधील धक्कादायक घटना
जालोर : पती-पत्नीने आपल्या ५ मुलांसह नर्मदा कालव्यात उडी घेतल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील सांचोरमध्ये घडली. 9 वर्षीय प्रकाशचा मृतदेह दुपारी चारच्या सुमारास बाहेर काढण्यात आला असून उर्वरितांचा शोध सुरू आहे. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. गोताखोरांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे, तर जोधपूरमधून एसडीआरएफच्या २ पथकांनाही पाचारण करण्यात आले आहे.
स्थानिक गोताखोरांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. गोताखोरांनी ९ वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाहेर काढला. स्थानिक गोताखोरांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. गोताखोरांनी ९ वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाहेर काढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घटनेची माहिती हेल्पलाइन १०१ अभय आदेश जालोरे यांना भंवर स्ािंग राजपूतने दिली होती. शंकर आणि त्यांच्या पत्नीसोबत भांडण झाले असून शंकरने रागात पत्नी व मुलांसह घर सोडले आणि सिद्धेश्वर गाठले. मुलांमध्ये ३ मुली आणि २ मुले होती. या सर्वांचे कपडे नर्मदा कालव्याच्या मुख्य कालव्याजवळ आढळून आले.
सांचोरचे सीओ रुप सिंह इंदा यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर दोघांनी मंगळवारीच पाच मुलांसह घर सोडले होते. याची माहिती बुधवारी पोलिसांना मिळाली. एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. तर उर्वरितांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी निशांत जैन आणि एसपी किरण कांग सिद्धू हे जालोर जिल्हा मुख्यालयातून घटनास्थळी रवाना झाले आहेत.