37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्राइमप्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून

एकमत ऑनलाईन

केज : तालुक्यातील लाडेवडगाव शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह तीन एप्रिल रोजी आढळला होता. या प्रकरणाचा तपास लावण्यात लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या पतीचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी मृताची पत्नी व तिच्या प्रियकराला बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे. त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तालुक्यातील लाडेगाव शिवारात आडस-होळ रस्त्यालगत अर्धवट जळालेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह तीन एप्रिल रोजी सकाळी आढळून आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. यादरम्यान हरवल्याची पोलिसात कोणाचीही तक्रार नसल्याने साहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या तक्रारीवरून अज्ञाता विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी तांत्रिक बाबी वापरून प्रथमत: मृतदेहाची ओळख पटविली. तो मृतदेह केज तालुक्यातील औरंगपूर येथील विठ्ठल ऊर्फ अशोक धायगुडे (वय-३५) याचा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी मृताच्या नातेवाइकांकडे चौकशी करून माहिती घेतली. कुटुंबातील एक जण बेपत्ता असतानाही नातेवाइकांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांना नातेवाइकांवरचा संशय अधिकच बळावला.

यासंबंधी पोलिसांनी कसून चौकशी केली असता मृताच्या पत्नीनेच अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या पतीचा खून केल्याचे समोर आले. त्यानंतर तात्काळ मृताची पत्नी सुमिदा विठ्ठल धायगुडे व तिचा प्रियकर रामदास किसन शितळकर (दोघे रा. औरंगपूर, ता. केज) यांना ताब्यात घेतले. त्यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दोन एप्रिलच्या रात्री आरोपी पत्नी पतीला शेतात झोपण्यासाठी घेऊन गेली. पतीला गाढ झोप लागल्याची खात्री होताच प्रियकरास बोलावून कु-हाडीचा वार करून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून लाडेवडगाव शिवारातील आडस-होळ रस्त्यालगतच्या कापसाच्या शेतात नेऊन जाळून टाकला अशी कबुली पोलिसांनी पकडलेल्या आरोपींनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या