26.4 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home क्रीडा हैदराबादने गुणांचा भोपळा फोडला

हैदराबादने गुणांचा भोपळा फोडला

एकमत ऑनलाईन

वेगवान आणि फिरकी गोलंदाजांच्या एकत्रित प्रयत्नांच्या जोरावर  हैदराबादने  तेराव्या आयपीएलमधील 11 व्या सामन्यात पहिल्या विजयाची नोंद केली. आणि गुणांचा भोपळा फोडला. त्यांनी गुणतक्त्यात आघाडीवर असणाऱ्या दिल्लीचा अबुधाबी च्या मैदानावर १५ धावांनी पराभव केला. या पराभवाने दिल्लीला आपले आघाडीचे स्थान गमवावे लागले दिल्ली कॅपिटल्स कर्णधार श्रेयस अय्यर ने नाणेफेक जिंकूनही  या स्पर्धेत धावांचा पाठलाग करणे सोपे जात असल्यामुळ  हैदराबादला फलंदाजीस पाचारण केले. सलग दोन विजय मिळवणाऱ्या दिल्लीला यावेळी मात्र फासे उलटे पडले त्यांना पराभव स्वीकारावा लागला हैदराबाद कर्णधार डेव्हिड वॉर्नर ला मात्र गुणांचा भोपळा फोडता आला. शारजा मैदानावर षटकारांची आतषबाजी होतीय धावांचा पाऊस पडतोय तर अबुधाबी वर लो स्कोरिंग सामने आहेत कमी धावांच्या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा फायदा उठवत आहे त्यामुळे चूरसही निर्माण होत आहे

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टॉ, केन विल्यम्सन यांच्या फलंदाजीमुळे २० षटकांत ४ बाद १६२ धावांची मजल मारता आली. आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा डाव ७ बाद १४७ असा संपुष्टात आला. दिल्लीच्या फलंदाजांना जखडून ठेवताना रशिद खाने १४ धावांत ३ गडी बाद केले. रशीद खान सामन्याचा मानकरी ठरला.

विजयासाठी दिल्लीला १६३ धावांचे आव्हान कठिण नव्हते. पण, पहिल्याच षटकांत भुवनेश्वरकुमारने पृथ्वी शॉला बाद केले. त्यांतर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर ही जोडी जमत असतानाच फुटली. त्यांनी ४० धावा जोडल्या.नंतर दिल्लीसाठी कुणीच उभे राहु शकले नाही. सिमरन हेटमेर आणि रिषभ पंत यांनी ४२ धावांची भागीदारी केली तरी त्यांना धावांचा वेग वाढवता आला नाही. रशिद खानने मधल्या टप्प्यात केलेली गोलंदाजीन दिल्लीवरील दडपण वाढवले त्याने ४ षटकांत केवळ १४ धावा देताना शिखर धवन  रिषभ पंत  आणि  श्रेयस अय्यर  हे तीन गडी बाद केले.

हेटमेर, पंत ही जोडी फटकेबाजीच्या नादात बाद झाल्यावर दिल्लीच्या आव्हानातील हवाच संपली. त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी हातचा विजय निसटणार नाही याची काळजी घेतली. कागिसो रबाडान २१धावात दोन.तर अमित शर्मा न ३५ धावात दोन बळी घेतले. फलंदाजी करताना हैदराबाद संघाला कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टॉ यांच्या सलामीनंतर डावाच्या शेवटी केन विल्यम्सनच्या फलंदाजीचा आधार मिळाल्याने आव्हानात्मक धावसंख्या उभी करता आली. संथ खेळपट्टीवर कागिसो रबाडा आणि अमित मिश्रा यांच्या वेगवान, फिरकी असा संमिश्र माऱ्यासमोर मधल्या षटकांत हैदरबादचा डाव रेंगाळला होता.

डेव्हिड वॉर्नर आणि जॉन बेअरस्टॉ यांनी ७७ धावांची सलामी दिली. वॉर्नर बाद झाल्यावर मनीष पांडे आधीच्या सामन्यातील जोश दाखवू शकला नाही. मग, बेअरस्टॉ आणि विल्यम्सन यांची जोडी जमली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावा जोडल्या. या वेळी बेअरस्टॉ अर्धशतकी खेळीनंतर लगेच बाद झाला. पण, अखेरीस विल्यम्सनने २६ चेंडूंत ४१ धावांची खेळी करून आव्हान भक्कम करण्यासाठी प्रयत्न केले. भुवनेश्वर कुमार आणि नटराजन यांनी ही हाणामारीच्या षटकात सुरेख गोलंदाजी केली दोघांनीही चार-चार षटकात पंचवीस धावा दिल्या भुवनेश्वरने दोन तर नटराजनी एक बळी घेतला

राजेंद्र भस्मे

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राजेंद्र मिरगणे थेट शेतकऱ्याच्या बांधावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या