Thursday, September 28, 2023

‘मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी, आई भवानी मातेचा उपासक’ उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली : राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विट करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेबाबत सभागृहात घेतलेल्या आक्षेपावरुन सुरु झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा खासदार म्हणून संसदेत शपथ घेतली. या वेळी उदयनराजे यांनी जय शिवराज अशी घोषणा दिली. त्यावर अशा घोषणा देण्यात येऊ नये, असे सांगत राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाचे नियम दर्शवले. यावरुन महाराष्ट्रात जोरदार वादंग सुरु झाला आहे. यावर व्यंकय्या नायडू यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी आणि आई भवानीचा उपासक आहे. राज्यसभा सभागृहात मी काल जी सूचना केली ती केवळ सभागृहाचे नियम आणि परंपरेला अनूसरुन होती. शपथ घेत असताना कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येत नाहीत. त्यामुळे तेवढेच मी निदर्शनास आणून दिले. यामागे कोणाचाही अवमान करण्याची भावना नव्हती, असे नायडू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, छत्रपती शिवरायांचा अपमना झाला अशी भावना निर्माण झाल्याने महाराष्ट्रात विविध संघटनांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या सर्व प्रकारावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली. उदयनराजे यांनी म्हटले आहे की, शिवाजी महाराज यांच्या नावाने आतापर्यंत खूप राजकारण झाले. शिवाजी महाराज यांचा कोणी अपमान केला असता तर, मी राजीनामा दिला असता. मी गप्प बसलो नसते, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.

भाजपा नेत्यांच्या विकृत मनोवृत्तीचा निषेध

Read More  कोरोनाला हरवून आलेल्यांचे औशात स्वागत

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या