22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक ; मनसेचा लूक बदलला, नवे...

मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक ; मनसेचा लूक बदलला, नवे घोषवाक्यही ठरले

एकमत ऑनलाईन

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणै दौ-यावर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा आज पुण्यातून प्रारंभ झाला. यावेळी राज ठाकरे यांनीच त्यांच्या नावाची पहिली नोंदणी केली. नव्या सभासद नोंदणीसह मनसेचा लूकही बदलला आहे.

इतकेच नाही तर मनसेच्या मराठी अस्मितेला हिंतुत्वाची जोड देणारे नवे घोषवाक्यही ठरले आहे.
मनसेच्या सभासद नोंदणीला आजपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी राज ठाकरे आज पुण्याच्या दौ-यावर आहेत. तिथे राज ठाकरेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी मोठ्या प्रमाणात मनसैनिक आणि पदाधिकारी तिथे उपस्थित होते. मनसेच्या सभासद नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पहिली नोंदणी केली. मनसेने मला सभासद करून घेतले यासाठी मी मनसेचे आभार मानतो, अशी मिश्किल टिप्पणी देखील राज ठाकरेंनी यावेळी केली.

मनसेचे नवे घोषवाक्य
नेहमी फक्त मराठीवर फोकस करणारे राज ठाकरे यांनी यंदा हिंदुत्वाचा मुद्दा मनसेच्या घोषवाक्यात सामील केला आहे. आता भारत नाही, हिंदूंचा हिंदुस्थान, असे नमूद केलेले राज ठाकरेंचे नवे पोस्टर पुढे आले आहे. यावर राज ठाकरेंचा हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी हिंदुजननायक, असा उल्लेख करण्यात आला आहे. तर ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, हे मनसेचे नवे घोषवाक्य देण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या