27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयमीही टुकडे टुकडे गँगचा सदस्य

मीही टुकडे टुकडे गँगचा सदस्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा आणि जावेद अख्तरच कशाला? मीही टुकडे टुकडे गँगचा सदस्य आहे, असं सांगतानाच नरोत्तम मिश्रा यांच्याकडे टुकडे टुकडे गँगची अधिक माहिती दिसतेय. त्यामुळे त्यांना तात्काळ केंद्रीय गृहमंत्री म्हणून नियुक्त केलं पाहिजे, असा टोला काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अभिनेत्री शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शहा यांना टुकडे टुकडे गँग म्हणून संबोधले आहे. हे तिन्ही लोक टुकडे टुकडे गँगच्या स्लीपर सेलचे एजंट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मिश्रा यांच्या या आरोपाचा काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी समाचार घेतला आहे.

पी. चिदंबरम यांनी ट्विट करून हा टोला लगावला आहे. मध्यप्रदेशातील गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शहा यांना टुकडे टुकडे गँगचा सदस्य का संबोधले? मीही टुकडे टुकडे गँगचा सदस्य आहे, अशी घोषणा मी संसदेत केली होती, असं पी. चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या