27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Home‘मी शिवसेनेतच’; कृषिमंत्री दादा भुसे

‘मी शिवसेनेतच’; कृषिमंत्री दादा भुसे

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेतले नाराज मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे. नाराज एकनाथ शिंदे हे इतर ३५ आमदारांसोबत गुजरातमधील एका हॉटेलात असल्याचा दावा केला जात आहे. नाराज १३ आमदारांवरून हा आकडा थेट ३५ आमदारांवर गेल्याने कोण कुणीकडे असा सवाल उपस्थित होत आहे.

यातच दरम्यानच्या काळात मंत्री असलेले दादा भुसे हे देखील ‘नॉट रिचेबल’ झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे आमदारांबरोबर आता मंत्रीही नाराज का अशी शंका उपस्थित होत असतानाच मी शिवसेनेसोबतच आहे. शिवाय शिवसेनेच्या बैठकीलाही उपस्थित राहणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेला मात्र, बैठकीसाठी आमदार आणि मंत्र्यांची जुळवाजुळव करण्याची नामुष्की ओढवली आहे.

कुठे आहेत कृषिमंत्री दादा भुसे?
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोणता आमदार कुठे याचा मागोवा घेतला जात आहे. शिवाय वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे. दरम्यान, कृषिमंत्री दादा भुसे हे देखील नॉट रिचेबल झाले होते.

मात्र, यासंबंधीच्या बातम्या प्रसारमाध्यमात प्रसारित होताच आपण सेनेसोबतच आहोत, शिवाय पक्षप्रमुख यांच्या आदेशाने मुंबईतच असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एक-एक आमदार आणि मंत्र्याच्या भूमिकेवर शिवसेनेचे लक्ष राहणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या