24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रमी कोणालाच घाबरत नाही : आमदार शिंदे

मी कोणालाच घाबरत नाही : आमदार शिंदे

एकमत ऑनलाईन

सातारा : खेड ग्रामपंचायतीत तीन आमदार आणि दोन खासदार यांची ताकद आमच्या विरोधात होती; पण माझ्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताकद आहे. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही, असा इशारा आमदार महेश शिंदे यांनी दिला.खेड ग्रामपंचायतीत आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सत्तांतर केले.

त्यानंतर आमदार शिंदे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्या मतदारसंघातील चार ग्रामपंचायतींच्या आज निवडणुका होत्या. यापूर्वी त्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होत्या. त्यातील खेड ग्रामपंचायतीमध्ये येथील जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास दिसत असल्याने या ग्रामपंचायतीमध्ये यश मिळत आहे.

चुकीच्या शक्तीचा पराभव होणारच
तसे पाहिले तर खेड ग्रामपंचायतीत विरोधकांकडे तीन आमदार आणि दोन खासदारांची ताकद होती; पण माझ्यामागे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ताकद आहे. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. राज्यातील प्रत्येक सामान्य माणूस शिंदे गट शिवसेना व भाजप सरकारच्या या विकासाच्या मागे उभा आहे. त्यामुळे यापुढे चुकीच्या शक्तीचा पराभव हा होणारच आहे.’ दोन खासदार म्हणजे एक साता-याचे श्रीनिवास पाटील आणि दुसरे अमोल कोल्हे असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या