22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रमी आजपासून ‘कुरेशी’ आहे; आशिष शेलारांचा व्हीडीओ व्हायरल

मी आजपासून ‘कुरेशी’ आहे; आशिष शेलारांचा व्हीडीओ व्हायरल

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपाचे मुंबईतले अध्यक्ष आशिष शेलार यांचा एक व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावरूनच आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा व्हीडीओ शेअर केला आहे. तसेच काँग्रेसकडूनही या व्हीडीओवरून शेलारांवर निशाणा साधण्यात आला आहे. या व्हीडीओमध्ये आशिष शेलार यांच्या भाषणातला काही भाग दाखवण्यात आला आहे.

शेलार आपल्या भाषणात म्हणतायत की, ‘जर कुरेशी हाजी अराफतसारखा असतो. कुरेशी प्रामाणिकपणे काम करतात. कुरेशी कोणालाही घाबरत नाहीत. आणि जर डोके टेकवायचे असेल तर ते फक्त देवापुढे नतमस्तक होते. या गोष्टींनी जर कुरेशी बनत असेल तर आजपासून आशिष शेलारही कुरेशी आहे.’

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा व्हीडीओ ट्विट करताना म्हटले आहे की, मतांसाठी आम्ही जात, धर्म, गोत्रही बदलायला तयार आहोत. शेलारांचे कुरेशी बनायलाही तयार आहोत. शेलार यांच्या भाषणातला हा भाग महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही ट्विट केला आहे. मला आशिष शेलारांचे हे भाषण आणि त्यांनी स्वत:चे केलेले नामकरण आवडले. तसेच त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेलाही शेलार यांचे भाषण आणि त्यांनी केलेले नामकरण आवडले का, असे विचारले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या