23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमी राज्यपालांना वाकून नमस्कार केला कारण ..

मी राज्यपालांना वाकून नमस्कार केला कारण ..

एकमत ऑनलाईन

धडकने लगा दिल, नजर झुक गई कभी उन से जब ‘सामना’ हो गया, – भाजपची राऊतांवर टिका

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनातील भेट हा आजचा चर्चेचा विषय ठरला . ही भेट का झाली यापेक्षा या भेटीत संजय राऊतांनी राज्यपालांना वाकून नमस्कार का केला ? याविषयी अनेक तर्कवितर्क आज लावण्यात आले. संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपालांवर प्रचंड टीका केली होती. राऊत यांच्या या टीकेमुळे राज्यपाल चांगलेच नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन या कटुतेला तिलांजली दिल्याचे सांगितले जातंय.

Read More  आयपीएल तर पैसा कमवायचा धंदा : बॉर्डर

संजय राऊत यांनी या भेटीवेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वाकून नमस्कार केला. हा फोटो सोशल मीडियावर काही मिनिटांमध्येच व्हायरल झाला. आता या फोटोबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे माझ्यापेक्षा मोठे असल्यामुळे त्यांना नमस्कार केला. आमच्या दोघांमध्ये चांगली चर्चा झाली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकासआघाडी सरकार चांगलं चालतंय, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, असं राज्यपालांना सांगितल्याचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

धडकने लगा दिल, नजर झुक गई कभी उन से जब ‘सामना’ हो गया….भाजपने निशाणा साधला 

Sanjay Raut Rajayapal Bjp

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. राज्यपालांवर आगपाखड करणारे संजय राऊत आज राज्यपालांना का भेटले याची चर्चा सुरू झाली. आजच्या या भेटीमध्ये संजय राऊत यांनी भगतसिंग कोश्यारींना वाकून नमस्कार केला. संजय राऊत यांचा हा फोटो सोशल मीडियावर काही मिनिटांमध्येच व्हायरल व्हायला सुरूवात झाली. संजय राऊत यांच्या या फोटोवर आता भाजपने निशाणा साधला आहे.

धडकने लगा दिल, नजर झुक गई कभी उन से जब ‘सामना’ हो गया, असं ट्विट भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलं आहे. या ट्विटसोबतच भाजपने संजय राऊत यांचा नमस्कार करत असल्याचा फोटोही शेयर केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या