26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रसावे राजकारणात येईल वाटले नव्हते ; तरी कॅबिनेट मंत्री झाले

सावे राजकारणात येईल वाटले नव्हते ; तरी कॅबिनेट मंत्री झाले

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : नव्याने झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या अतुल सावे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले, जे राजकारणात येतील असे वाटलेही नव्हते पण आज कॅबिनेटमंत्रिपदापर्यंत पोहोचले, असा टोमणा संजय शिरसाट यांनी लगावला. औरंगाबादेत रविवारी झालेल्या कार्यक्रमात अतुल सावे यांना लगावला. या वेळी शिंदे गटातील नाराज संजय शिरसाट यांच्या मनातली खदखद पुन्हा बाहेर आली.

रविवारी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. आमदार संजय शिरसाट, सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत रोपळेकर चौकात हा कार्यक्रम झाला. यावेळी संजय शिरसाट यांनी अतुल सावेंच्या मंत्रिपदाबाबत वक्तव्य करत म्हणाले, ‘ अतुल सावेंचंच पहा. त्यांच्या वडिलांसोबत मी स्वत: काम केले आहे. पण अतुल सावे राजकारणात येतील असं काही वाटले नव्हते.. पण तो आला काय.. राज्यमंत्री आणि त्यांनतर कॅबिनेट मंत्री झाला काय, इथे शिंदे गटाचे काहीच राहिलेच नाही.. असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले.

औरंगाबादेतील एकनाथ शिंदे यांच्या गटात पाच आमदार गेले आहेत. या शिवसेना आमदारांना बंडात शामिल करून घेण्यासाठी संजय शिरसाट यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. मात्र तरीही ऐनवेळी त्यांच्या वाट्याला मंत्रिपद न आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.

‘माझ्याविरोधात कुणी उभे करू नका’
औरंगाबादेतील या कार्यक्रमात भाजपला उद्देशून संजय शिरसाट म्हणाले, मला इथे भाजप शिवसेना एकत्र दिसत आहेत. त्यामुळे निवडणुकीतही एकत्रच रहावे. उगाच माझ्याविरोधात कुणी उभे करू नका. आपल्याला मिळून दुस-यांविरोधात लढायचे आहे हे लक्षात ठेवा.

अतुल सावेंचीही ग्वाही
माझ्याविरोधात कुणाला उभे करू नका, या शिरसाटांच्या विनंतीला अतुल सावेंनीही उत्तर दिले. तुम्हाला इथे कोणताही त्रास होणार नाही, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या