मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत छापून आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. मी फिक्स मॅच पाहत नाही.
मी लाईव्ह मॅच पाहत असतो. खरी मॅच पाहत असोत. पण जी फिक्स मॅच आहे, ती पाहून त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची? काही दिवासांनी काही गोष्टी येतील तेव्हा पाहू. तेव्हा देऊ प्रतिक्रिया देऊ, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत. तसेच काँग्रेसचे आंदोलन निरर्थक आहे. आम्हीही काही तरी केलंय. आम्हीही तुमच्या पाठी आहोत. भविष्यात आम्हालाही काही तरी द्या.
एवढंच सांगण्यासाठी ते आंदोलन आहे. बाकी त्यात काही नाही. त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असे फडणवीस म्हणाले.