गुवाहाटी : एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आज दुपारी गोव्याकडे रवाना होणार आहेत. त्यापूर्वी या सर्व आमदारांनी गुवाहाटी येथील कामाख्य मंदीरात जाऊन दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जादू टोणा केलाय त्यामुळे देवीच्या दर्शनाला आलोय असे म्हणत शिवसेनेच्या आरोपाला त्यांनी मिश्किल उत्तर दिले आहे.
तत्पूर्वी, जादू टोणा करून सर्व आमदारांना गुवाहाटीत नेण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यानंतर जादू टोणा केलाय त्यामुळे आम्ही सर्व आमदार गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या दर्शनाला आलो असल्याचे प्रत्युत्तर बंडखोर आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेला दिले आहे.