24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमी काँग्रेसच्या विचाराचा ; पृथ्वीराज चव्हाण

मी काँग्रेसच्या विचाराचा ; पृथ्वीराज चव्हाण

एकमत ऑनलाईन

कराड : मी काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे माहीत नाही. पण मी काँग्रेसच्या विचाराचा आहे. आम्हाला भीती आहे की लोकशाही धोक्यात आहे. काँग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा, अशी मागणी ऑगस्ट २०२० मध्ये केली होती. सोनिया गांधी यांनी ही मागणी मान्य केली. त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानत पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधील पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होत आहे. कोरोनामुळे अध्यक्षांचा थेट संवाद होत नव्हता. त्यांच्या भेटीसाठी वेळ मिळाली नाही. यामुळे अध्यक्षांना पत्र लिहिले होते. ते गोपनीय होते. ते पत्र फोडले. काँग्रेसचा अध्यक्ष थेट नेमणुकीद्वारे होऊ नये. त्यासाठी निवडणूक व्हावी. पक्ष लोकशाही पद्धतीने चालायचा असेल तर अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, असे चव्हाण म्हणाले.

काँग्रेस पक्ष लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे. भाजपला एकमेव काँग्रेसच तोंड देऊ शकतो, असेही ते म्हणाले. गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्यावर बोलताना चव्हाण यांनी गोव्यात दुर्दैवी घडले असल्याची प्रतिक्रिया दिली. काश्मीरमधील सर्व लोक गेलेत. आता ही दुसरी घटना आहे. देशात हा पॅटर्नच सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेण्याच्या घटनेवर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा दुर्दैवी निर्णय आहे. फॉक्सकॉनची ब-याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. गुजरात चित्रात नव्हते. एकदम हा प्रकल्प गुजरातला नेला. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपामुळे हे झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या