23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रमला राज्यात शांतता हवीय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मला राज्यात शांतता हवीय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एकमत ऑनलाईन

मुंबई : पुण्यात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे दोघेही दौ-यावर होते. यावेळी काही शिवसैनिकांनी गद्दार गद्दार म्हणत शिंदे गटातल्या उदय सामंत यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. यावरूनच आता मुख्यमंत्री शिंदेंनी सुनावले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून ही मर्दुमकी नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. कायदा-सुव्यवस्था पोलिस पाहतील, प्रक्षोभक भाषण कोणी करत असेल तर पोलिस कारवाई करतील. मला राज्यात शांतता हवी आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उदय सामंत यांच्यावर भ्याड हल्ला झाला आहे. ही मर्दुमकी नाही. कोणी कायदा, सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असेल तर पोलिस कारवाई करतील. कोणी आततायीपणा केला तरी पोलिस कारवाई करतील.

गुन्हा केल्यावर पोलिसांना सांगावे लागत नाही की गुन्हा दाखल करा. जे कोणी चिथावणीखोर भाषण करत असेल तर पोलिस कारवाई करतील. कायदा-सुव्यवस्था पोलिस पाहतील, प्रक्षोभक भाषण कोणी करत असेल तर पोलिस कारवाई करतील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या