29 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeमहाराष्ट्रअवैध दारू धंदेवाल्यांमुळे माझ्यावर हल्ला

अवैध दारू धंदेवाल्यांमुळे माझ्यावर हल्ला

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यातील अवैध दारू आणि अवैध गुटख्याचे प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आल्यानेच आपल्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोप काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला. हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ आहे असे सांगत प्रज्ञा सातव यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेमध्ये बोलताना त्यांनी हा आरोप केला.

जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर बोलताना आमदार प्रज्ञा सातव म्हणाल्या की, विना नंबरच्या दुचाकीवरून हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक गावात अवैधरित्या दारू पोहोचवणारी यंत्रणा निर्माण झाली आहे. त्यामुळे तरुण पीढीला सहजरित्या दारु उपलब्ध होत असून ही पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचारात वाढ होताना दिसत आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी गुटखा आणि जुगाराचा धंदा सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, असा आरोप आमदार प्रज्ञा सातव यांनी केला. त्या म्हणाल्या की, हिंगोली जिल्ह्यात दररोज लाखोंचा गुटखा आणला जात आहे. या संदर्भात मी विधानपरिषदेत दोनवेळा प्रश्न उपस्थित केल्याने याचा त्रास मलासुद्धा सहन करावा लागला आहे. दारू माफियांच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला झाला आहे. गेल्या महिन्यात ८ फेब्रुवारी रोजी आमदार प्रज्ञा सातव या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावाच्या दौ-यावर होत्या. त्यावेळी त्यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहणार, असेही त्या म्हणाल्या. कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या