26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही

मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही, असे विधान शरद पवार यांनी केले आहे. राज्यातील सध्याच्या घडीच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

मी देखील ८२व्या वर्षी पंतप्रधान होण्याचा कित्ता गिरवणार नाही, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का, याबाबतची चाचपणी सुरू असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यांचा राजकीय अर्थ काढला गेला नाही, तरच नवल! महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास शरद पवार यांचा मोठा वाटा होता.

त्यामुळे आता शिवसेना फुटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर तीन पक्षांच्या आघाडीचे काय होणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शरद पवारांनी केलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या