आफ्रिदीला पंतप्रधान मोदीवर टीका करणे पडले महागात
नवी दिल्ली : पाकचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं नुकताच पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळी त्यानं पुन्हा एकदा काश्मीरवरून तारे तोडले. आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वक्तव्य केलं होतं. यावर भारतीय क्रिकेटपटूंनी पलटवारही केला.
आता गौतम गंभीरनंतर फिरकीपटू हरभजनसिंगसुद्धा आफ्रिदीवर भडकला आहे. आफ्रिदीने साºया सीमा ओलांडल्या असल्याचं हरभजन सिंग एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला. आपल्या देशाबाबत आणि पंतप्रधानांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर बोलणं सहन केलं जाणार नाही असा इशाराही हरभजनने दिला. काही दिवसांपूर्वी हरभजन आणि युवराजने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शाहिद आफ्रिदीच्या फाउंडेशला मदत करण्यासाठी अपील केलं होतं.
Read More विलग राहणे मान्य केले तरच रेल्वे तिकीट
हरभजन म्हणाला की, मी या देशात जन्माला आलो आणि इथंच शेवटचा श्वास घेणार आहे. देशासाठी २० वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. मी देशाविरोधात काही केलं आहे असं कोणी म्हणू शकत नाही. आज किंवा उद्या जर गरज पडली सीमेवरही जाईन. देशासाठी बंदूक हातात घेईन. शाहिद आफ्रिदीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये पातळी सोडली. खरंतर त्याच्या फाउंडेशनला आम्हीच लोकांना दान करा असं आवाहन केलं. ते फक्त माणुसकीच्या नात्यानं केलं होतं ,आफ्रिदी आपल्या देशाबद्दल वाईट विचार करतो. मला एवढंच सांगायचं आहे की आफ्रिदीशी आमचं काही देणं घेणं नाही. आमच्या देशाविरुद्ध काहीही बोलण्याचा त्याला अधिकार नाही. आता त्याच्यासोबत कसलेच संबंध नाहीत असंही हरभजन सिंगने स्पष्ट केलं.
‘काश्मिर आमचा होता आणि आमचाच राहणार’
पाकिस्तानाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर गौतम गंभीर, हरभजन ंिसग आणि युवराज ंिसग सोबत शिखर धवनने देखील आफ्रिदीला चांगलचे खडसावले आहे. शिखर धवन म्हणाला की, ‘सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूशी सामना करत आहे आणि तुम्हाला अजूनही काश्मिरची पडली आहे. काश्मिर आमचा होता आणि आमचाच राहणार. तुम्ही २० कोटी लोक घेऊन या, आमच्या एक लाखाच्या बरोबर आहे. आता याची तूच बेरीज करत बस.’ असे धवनने सुनावले आहे.