22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Home‘आयएएस’ अधिका-याकडे सोन्याच्या विटा, बिस्किटे

‘आयएएस’ अधिका-याकडे सोन्याच्या विटा, बिस्किटे

एकमत ऑनलाईन

‘आयएएस’ अधिका-याकडे सोन्याच्या विटा, बिस्किटे
चंडीगड : पंजाबमधील ज्येष्ठ आयएएस अधिकारी संजय पोपली यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक केल्यानंतर दक्षता पथकाने त्यांच्या राहत्या घरी धाड टाकली.

या धाडीत त्यांच्या स्टोअर रुममधून १२ किलो सोने, ३ किलो चांदी, ४ अ‍ॅपल फोन, आयफोन, १ सॅमसंगचा फोल्ड फोन आणि २ स्मार्टवॉच जप्त करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. पोपली यांच्या घरात १२ किलो सोन्यापैकी ९ किलो विट, ४९ सोन्याची बिस्किटे, १२ सोन्याचे सिक्के यांचा समावेश आहे.

३ किलो चांदीमध्ये १ किलोच्या ३ विट, १८ चांदीचे सिक्के सापडले आहेत. आयएएस अधिकारी संजय पोपली यांना नवाशहर सीवरेज पाइपलाइन योजनेतील निविदेला मंजुरी देण्यासाठी ७ लाख रुपये लाच आणि १ टक्के कमिशन मागितल्याच्या आरोपाखाली २० जूनला अटक करण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या