23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयICMR ची परवानगी : भारतानं शोधले 'कोरोना'चे औषध

ICMR ची परवानगी : भारतानं शोधले ‘कोरोना’चे औषध

एकमत ऑनलाईन

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आयुर्वेदिक घटकांपासून औषधं तयार करण्याच्या प्रक्रियेला हिरवा कंदिल दाखवला
औषधांनी गंभीर स्थितीत असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता आयसीएमआरने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आयुर्वेदिक घटकांपासून औषधं तयार करण्याच्या प्रक्रियेला हिरवा कंदिल दाखवला आहे. एलोपेथी आणि आयुर्वेदिक घटकांपासून तयार झालेल्या या औषधांनी गंभीर स्थितीत असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात.

पहिल्या टप्प्यात कोविड रुग्णालयांना पुरवठा
आयुर्वेद तज्ज्ञ प्राध्यापक राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या औषधांच्या निर्मितीतील पहिल्या टप्प्यातील औषधं फक्त कोविड रुग्णालयातील रुग्णांसाठी पुरवण्यात येणार आहेत. काही दिवसानंतर ही औषधं बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ऋषिकेश येथील आयुर्वेदाचार्य योगीराज निर्वाण देव यांच्या सहकार्याने ही औषधं तयार केली जात आहे. 12 आयुर्वेदिक आणि 1 एलोपेथी घटक मिळून पहिला काढा तयार करण्यात आला आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यानंतर या काढ्यापासून औषध तयार करण्यात आलं आहे.

Read More  पुण्यात बनावट नोटांचे रॅकेट चालविणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश !

5 व्या दिवशी सकारात्मक परिणाम
कोरोनाने संक्रमित असलेल्या 40 रुग्णांवर या औषधांचे परिक्षण करण्यात आले. त्यामध्ये 9 रुग्ण हे 60 वर्षावरील वयोगटातील होते. त्यांना दमा, डायबेटिस, कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित आजार होते. हे औषध दिल्यानंतर 26 रुग्णांचा रिपोर्ट 5 व्या दिवशी निगेटिव्ह आला. चार रुग्ण 10 व्या दिवशी बरे झाले. आता 10 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हा रिपोर्ट आयसीएमआरकडे पाठवल्यानंतर हे औषध तयार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

औषध बाजारात उपलब्ध करणार
या औषधाबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली आहे. त्यांनी हे औषध कोरोना रुग्णालयांसाठी तयार करण्यास सांगितले आहे. संक्रमणाची तीव्रता कमी करण्यासाठी तसंच रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी या औषधांसाठी आवश्यक असलेल्या घटकांची उपलब्धता पाहून हे औषध बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या