23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeमहाराष्ट्रगृहमंत्रिपद दिल्यास सत्तेत सहभागी होऊ; अमित ठाकरेंचे मोठे विधान

गृहमंत्रिपद दिल्यास सत्तेत सहभागी होऊ; अमित ठाकरेंचे मोठे विधान

एकमत ऑनलाईन

अंबरनाथ : गृहमंत्रिपद मिळाले तर शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू, असे सूतोवाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी केले. मनसेच्या आयोजित संवाद दौरा कार्यक्रमानिमित्त त्यांनी शुक्रवारी अंबरनाथला भेट दिली. या वेळी प्राचीन शिवमंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.

संवाद दौ-यात अमित ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई ते अंबरनाथदरम्यान लोकलने प्रवास केला. या वेळी शहराध्यक्ष कुणाल भोईर, धनंजय गुरव, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी अमित ठाकरे यांचे अंबरनाथ रेल्वे स्थानकात जल्लोषात स्वागत केले. अमित ठाकरे यांनी प्राचीन शिवमंदिराला भेट दिली. त्यानंतर अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी मनसेला दोन मंत्रिपदे मिळणार असल्याच्या चर्चांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सूचक विधान केले. गृहमंत्रिपद देणार असतील तर सत्तेत सहभागी होऊ असे म्हणत पण ते देत नसल्याचा मिश्कील टोला अमित ठाकरे यांनी लगावला. तसेच पालिका निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिका-यांशी चर्चा केली असून त्याबाबतचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर केला जाणार असल्याचे अमित ठाकरे या वेळी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या