Tuesday, September 26, 2023

नोकऱ्या गेल्या असतील, पगार कपात झाली असेल तर आम्हाला संपर्क साधा, मनसेचं तरुणांना आवाहन

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ देशात लॉकडाऊन आहे. सर्व कंपन्या बंद असल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंद्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, ज्यांना उद्योगात तोटा झालाय अशा सर्वांसाठी काम करणार आहे. त्यासाठी मनसेने एक नंबरही जाहीर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी याबाबतचा एक व्हिडीओही ट्विटरवर पोस्ट केला आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, ‘लॉकडाऊनमुळे आपली पूर्ण अर्थव्यवस्था डळमळीत झालेली आहे. त्यामुळे लाखो मराठी मुलांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींच्या नोकऱ्या जात आहेत. त्याचप्रमाणे अनेकांचे उद्योगधंदे बंद पडत चालले आहेत. उद्योजकांकडे पैसे नाहीत. पगार द्यायला पैसे नाहीत. लोकांकडे नोकऱ्या नाहीत. या सर्व अडचणींचा सामना करण्यासाठीच आम्ही एक नंबर जाहीर करत आहे. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांनी यावर आम्हाला संपर्क साधावा.’

‘सरकार फक्त फेसबुकवर येते. गोड-गोड बोलते की तुमची नोकरी गेली नाही पाहिजे. पण यावर काही ठोस कारवाई करत नाही. केंद्रातून 20-20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर होतात. पण प्रत्यक्षात उद्योग क्षेत्राला काय मिळते. ठेंगा’, असंही देशपांडे म्हणाले.

Read More  उत्तर प्रदेशात २५ वर्षीय तरुणाला झाडाला बांधून जिवंत पेटवले

‘मुलांच्या नोकऱ्या जात असताना सरकार त्यांना ठोस आश्वासन किंवा नोकऱ्यांवरुन काढणाऱ्या त्या कंपन्यांवर योग्य ती कारवाई का करत नाहीत. माझी सर्वांना अशी विनंती आहे की, ज्यांच्या नोकऱ्या जात आहेत. ज्यांचे उद्योग धंदे बंद होत आहेत किंवा ज्यांच्या पगारात कपात केली जात आहे, अशा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा नंबर आम्ही तुम्हाला देत आहोत. या नंबरवर आपण फोन करावा आणि आपली माहिती त्यांनी आम्हाला द्यावी. जेणेकरुन ही सर्व माहिती गोळा करु. कारण आपल्याला माहिती आहे सरकार याबाबत कोणताही सर्व्हे करत नाही. फक्त फेसबुकवर येऊन बोलत आहेत. पण कुठलाही सर्व्हे करत नाही’, असं देशपांडे म्हणाले.

‘माझी अनेक उद्योगधंद्याना विनंती आहे की ज्यांना कामासाठी लोकं, कामगार लागणार असतील त्यांनी सुद्धा आम्हाला संपर्क साधावा. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांना आम्ही या नोकऱ्या देऊ. तसेच ज्यांना बँका उभे करत नाही अशाही सर्वांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा’, असंही देशपांडे यांनी सांगितले.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या