27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयदेशात समान नागरी कायदा आणला तर संसदेत विरोध करू

देशात समान नागरी कायदा आणला तर संसदेत विरोध करू

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारमध्ये समान नागरी कायद्यावरून वाद वाढत चालला आहे. असा कोणता कायदा आल्यास राजद संसदेत विरोध करेल असे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजपला सुनावले आहे. ते म्हणाले, आरएसएसला देशात संविधानाच्या जागी आपला अजेंडा राबवायचा आहे. सध्या देशातील सरकार नागपुरातून चालवले जात आहे. जेव्हा सरकार हा कायदा आणेल, तेव्हा राष्ट्रीय जनता दल त्याला विरोध करेल.

यासोबतच सीबीएसईच्या अभ्यासक्रमात उर्दू विषयाच्या चॅप्टरबाबत करण्यात आलेल्या बदलांनाही विरोध करणार असल्याचे तेजस्वी यांनी सांगितले आहे. तर, दुसरीकडं आरजेडी कार्यकर्ता रामराज यांच्यासोबत तेजप्रताप यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या आरोपावर तेजस्वी यादव यांनी याबाबत माहिती घेतली जाईल असे सांगितले आहे. सध्या बिहारमधील राजकारण समान नागरी कायद्यावरून जोरात सुरू आहे. भाजप ही काळाची गरज असल्याचे म्हणत असताना, जेडीयू संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी देश संविधानावर चालतो आणि भविष्यातही चालत राहील असे म्हटले आहे. बिहारमध्ये समान नागरी संहितेची गरज नसताना मग प्रश्न येतोच कुठून? बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सरकार आहे आणि त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कोणत्याही किमतीत समान नागरी संहिता लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

उपेंद्र कुशवाह पुढे म्हणाले, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपले राहणीमान, खाणे-पिणे या गोष्टींच्या आधारे तयार झालेली आपली संस्कृती ही आपल्या भारताची संस्कृती आहे. हे आमचे सौंदर्य आहे. हे सौंदर्य बिघडवून काय उपयोग? मला वाटत नाही की, त्यात काही छेडछाड करण्याची गरज आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या