27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रबंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा

बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील, तर नागरिकांनी स्वत:हून मास्क वापरणे, लस घेणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. आरटीपीसीआर चाचण्या व लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोविड स्थितीचा आढावा घेतला. बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिका-यांसह टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ संजय ओक, सदस्य शशांक जोशी डॉ. राहुल पंडित उपस्थित होते. कोरोना अजून संपलेला नाही, जगभरात त्याचे नवनवीन विषाणू जन्माला येत आहेत. चीनमध्ये ४० कोटी जनता सध्या लॉकडाऊनमध्ये आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या