22.1 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeजालनाजालन्यात क्लिनिकमध्ये अवैध लिंगनिदान

जालन्यात क्लिनिकमध्ये अवैध लिंगनिदान

एकमत ऑनलाईन

जालना : जालन्याच्या एका रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून इथे जन्माच्या आधीच निष्पाप कळ्यांना मारण्याचा प्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे. जालना इथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांच्या टीमने एका अवैध गर्भपात केंद्रावर छापा टाकला असता तेथे अवैध गर्भनिदान सुरू असल्याचे उघडकीस आले.

डॉ. सतीश गवारे यांच्या राजुरेश्वर क्लिनिक ढवळेश्वर या भोकरदन रोड जालना इथे ल्ािंगनिदान आणि अवैध गर्भपात करणारे नोंदणीकृत नसलेले अल्ट्रासाउंड मशीन असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर टीमने राजुरेश्वर क्लिनिक इथे छापा टाकला.क्लिनिकमध्ये गरोदर महिलेला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्यात येत होता. महिलेस भयंकर वेदना होत होत्या. क्लिनिकमधील परिस्थिती पाहून टीमने तात्काळ त्या महिलेस जिल्हा स्त्री रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.

यानंतर काही वेळाने गर्भपात करण्याच्या गोळ्या महिलेला दिल्याचे स्पष्ट झाले. या अवैध गर्भपात केंद्राची झडती घेतली असता त्यांनी लपवून ठेवलेल्या गर्भपाताचे तीन एमटीपी किट आणि एक वापरलेले एमटीपी किट आढळून आले. इतकेच नाहीतर जप्त केलेल्या वस्तूंमध्ये ब-याच डॉक्टरांचे रेफर बुक, रजिस्टर, एमटीपी किट, नगदी रुपये, रुग्णाला लावलेली सलाईन इत्यादी साहित्य सापडले. वैद्यकिय गर्भपात कायद्यानुसार पोलिस ठाणे चंदनझिरा इथे गुन्हा नोंद केला आहे.

सोनोग्राफी मशीनसह डॉक्टर फरार
चौकशीअंती संपूर्ण प्रकरण स्त्री भ्रूण हत्येचे होते. टीमच्या सतर्कतेमुळे सदर महिलेचे प्राण वाचले. दरम्यान, या धडक कारवाईत डॉ. सतीश गवारे सोनोग्राफी मशीनसहीत फरार झाला.१२ ते १५ हजार रुपये घेऊन गर्भलिंग निदान तर १८ ते २० हजार रुपये घेऊन सतीश गर्भपात करायचा अशी माहिती आता समोर आली आहे. जन्मापूर्वीच निरपराध कळ्या खुडण्याचा हा गोरखधंदा उघडकीस येताच वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. दरम्यान पोलिस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या