Tuesday, October 3, 2023

शिक्षकाचे अनुदानासाठी घरातच अमरण उपोषण

कळंब : तालुक्यातील जायफळ येथील प्रा. भाऊसाहेब खिचडे यांनी विनाअनुदानीत शाळेतील शिक्षकांना अनुदान मिळावे, या मागणीसाठी गुरुवारी दि.२३ पासून घरीच अमरण उपोषणास सुरूवात केली असून उपोषणाचा तिसरा दिवस उलटला आहे.

महाराष्ट्रातील अनुदान पात्र शाळेतील शिक्षकांना १ एप्रिल २०१९ पासून पगार देण्यात यावा, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यादी व १ एप्रिल २०१९ पासून प्रचलित धोरणानुसार अनुदान देण्यात यावे, qबदू नामावलीची टाकलेली अट रद्द करावी. आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या उपोषणाबाबतची माहिती यांना निवेदनाव्दारे कळवली आहे.

Read More  शेतकरी, शेतमजूर विद्यार्थ्यांना न परवडणारे ऑनलाईन शिक्षण बंद करा

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या