23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्ररेड झोनमध्ये निर्बंध सैल करणं अशक्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रेड झोनमध्ये निर्बंध सैल करणं अशक्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एकमत ऑनलाईन

महापालिका क्षेत्रातल्या रेड झोन क्षेत्रांमध्ये निर्बंधांमध्ये फारशी शिथिलता आणता येणार नाही

मुंबई : लॉकडाऊन का वाढवला हे सांगत असतानाच नवा लॉकडाऊन कसा असेल याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आणखी काही निर्बंध शिथिल होणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. पण महापालिका क्षेत्रातल्या रेड झोन क्षेत्रांमध्ये निर्बंधांमध्ये फारशी शिथिलता आणता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

31 मे पर्यंत महाराष्ट्रासह देश लॉकडाऊनमध्ये आहे. पण यामागे कुणाला डांबून ठेवायचा उद्देश नाही, असं ठाकरे म्हणाले. “कुणालाही घरात डांबून ठेवणं यासारखी शिक्षा नाही. लॉकडाऊनचं चक्रव्यूह भेदणार आहोत की नाही, याचं उत्तर जगात कुणाकडे नाही. आपल्याकडेही नाही”, असं त्यांनी सांगितलं.

Read More  शेतक-यांच्या कापसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार

गतिरोधक म्हणून लॉकडाऊनचा उपयोग झाला आहे

महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढते आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद इथे जास्त रुग्ण आहेत. जर लॉकडाऊन, संचारबंदी केली नसली तर रुग्णसंख्या किती झाली असती, किती लोक गमावले असते याची आकडेवारी ऐकून अंगावर काटा येतो. कोरोना संपलेला नसला, तरी त्याचा संसर्ग कमी झाला आहे. गतिरोधक म्हणून लॉकडाऊनचा उपयोग झाला आहे.

5 लाख मजूर आणि कामगार काम करू लागले

आजपर्यंत 50 हजार उद्योग सुरू झाले आहेत. 5 लाख मजूर आणि कामगार काम करू लागले आहेत. 70 हजार उद्योगांना परवानगी दिली आहे. पण महापालिका क्षेत्रात निर्बंध अजूनही कडक आहेत. महापालिकांच्या व्यतिरिक्त भागात उद्योग सुरू झाले आहेत. कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्यामुळे आजपासून देशभरात चौथ्यांदा टाळेबंदी कायम ठेवली आहे. या लॉकडाऊन 4.0 ला सुरुवात झाली असली तरी या लॉकडाऊनमध्ये आधीपेक्षा अनेक निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या