35.2 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयइम्रान खान सरकारच्या १५० लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द

इम्रान खान सरकारच्या १५० लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडून यांच्यासह जवळपास १५० फेडरल आणि प्रांतीय लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडून जवळपास १५४ लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व निलंबित केले होते. मात्र या सदस्यांनी संबंधित तपशील सादर केल्यानंतर त्यांना पुन्हा सदस्यत्व बहाल करण्यात आले होते. मात्र यंदा मंत्री फवाद चौधरी आणि सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद तसेच अली शाह यांच्यासह जवळपास १५० फेडरल आणि प्रांतीय लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करण्यात आले आहे.

संसदीय कामकाजात भाग घेऊ शकत नाहीत
ज्या प्रतिनिधींचे सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे. ते संसदीय कामकाजात भाग घेऊ शकत नाहीत आणि त्यांनी संबंधित तपशील सादर करेपर्यंत त्यांचे सदस्यत्व निलंबित राहील, असे निवडणूक आयोगाकडून म्हटले गेले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या