34.2 C
Latur
Wednesday, May 31, 2023
Homeआंतरराष्ट्रीयइम्रान यांना चीनने लावला 32 अब्ज रुपयांचा चुना

इम्रान यांना चीनने लावला 32 अब्ज रुपयांचा चुना

एकमत ऑनलाईन

वीज उत्पादक कंपन्यांनी 60 अब्ज रुपयांची गुंतवणूक : दोन-तीन वर्षात 400 अब्ज रुपयांचा नफा

इस्लामाबाद, 21 मे : पाकिस्तानने अनेकदा चीनला आपला सर्वात जवळचा मित्र मानले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हाच मित्र भागीदारीच्या नावाखाली पाकचे आर्थिक नुकसान करीत आहे. चिनी कंपन्या पाकिस्तानमध्ये 62 अब्ज डॉलर्सच्या खर्चाने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअर अंतर्गत मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वीजेच्या वाढत्या किमतींबाबत चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली होती, ज्याने आपल्या अहवालात चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोअर अंतर्गत चीनी कंपन्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. मधील पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्टाचार यामुळे पाकिस्तानला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. पाकिस्तानच्या ‘पॉवर सेक्टर ऑडिट कमिटी, सर्क्युलर डेबट रिझर्वेशन अॅण्ड फ्यूचर रोडमॅप’ने 278 पानांचा रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की वीज निर्मिती क्षेत्रात अनियमिततेमुळे 100 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. यापैकी तोटा एक तृतीयांश चीनी प्रकल्पांमुळे झाला आहे.

Read More  पाकिस्तानला हवे आणखी २ अब्ज डॉलरचे कर्ज

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, समितीने आपल्या रिपोर्टमध्ये खुलासा केला आहे की अंतर्गत हून्ग शेडोंग रुई एनर्जी आणि कासिम इलेक्ट्रिक पॉवर कंपनी लिमिटेड कोळसा प्रकल्पांनी आपला खर्च खूपच जास्त दाखवला आहे. समितीच्या अहवालानुसार, चीनमधील कोळशावर आधारीत दोन प्रकल्पांसाठी सुमारे 32.46 अब्ज रुपये (पाकिस्तानी रुपये) च्या अतिरिक्त खर्चास मान्यता दिली. बांधकाम कंपन्यांच्या रिलीझ दरम्यान चीनी कंपन्यांना 48 महिन्यांसाठी व्याज दरात सूट देण्यात आली होती, परंतु खरं तर प्लॅंटचे संपूर्ण काम 27-29 महिन्यांत पूर्ण झाले. यामुळे कंपन्यांना जादा मोबदला मिळाला. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे 6% वार्षिक अवमूल्यन पाहता हा नफा आणखी वाढतो.

चिनी कंपनीने बांधकाम कामादरम्यान दीर्घकालीन कर्ज घेतले होते. दरम्यान, समितीने ज्या दोन प्रकल्पांचा तपास केला आहे, त्यांची सुरुवातीची किंमत 8.8 अब्ज होती. मात्र समितीला असे आढळले की कंपन्यांना अतिरिक्त 483 अब्ज रुपये दिले गेले आहेत, जे सध्याच्या विनिमय दरावर 3 अब्ज डॉलर्स इतके आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 16 चिनी वीज उत्पादक कंपन्यांनी 60 अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आणि गेल्या दोन-तीन वर्षात 400 अब्ज रुपयांचा नफा कमावला.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या