27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeऔरंगाबादऔरंगाबादेत जन्मदात्या पित्याकडूनच मुलीवर अत्याचार

औरंगाबादेत जन्मदात्या पित्याकडूनच मुलीवर अत्याचार

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : खेळण्या बागण्याचं वय असलेल्या चिमुकलीला वाईट घटनांचा सामना करावा लागला. अवघ्या सहाव्या वर्षी जन्मदात्या बापाचीच स्वत:च्या मुलीवर वाईट नजर पडली. घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू झाले. तब्बल ११ वर्षे ही नरकयातना भोगल्यावर युवती घरातून पळून गेली. पोलिसांनी तिचा शोध घेतला. तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बाप- लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली.

युवतीने सांगितली, ते ऐकून पोलिसांही थक्क झाले. मुकुंदवाडी आणि पुंडलीकनागर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता गुन्हा दाखल करून आरोपी नराधम बापाला बेड्या ठोकल्या. कुमार अशोक गोपाल असे या नराधमाचे नाव आहे.
१२ वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांनी त्या बेपत्ता मुलीचा शोध घेऊन तिला परभणी जिल्ह्यातून औरंगाबादला आणले.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आणले. त्या मुलीला महिला अधिका-यांनी विश्वासात घेत विचारपूस केली तेव्हा वडीलच अत्याचार करीत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

अवघ्या ६ वर्षाची असताना बापाची वाईटनजर तिच्यावर पडली होती. तब्बल ११ वर्षे ही नरकयातना तिने निमूटपणे सहन केली. दीड महिन्यांपूर्वी पुन्हा आरोपी बापाने इच्छे विरुद्ध युवतीवर बलात्कार केला. त्यामुळे ती परभणी जिल्ह्यातील एका मित्राकडे पळून गेली. अशी माहिती तिने पोलिसांकडे दिली.

मुकुंदवाडी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा नुसार आरोप बापा विरोधात गुन्हदाखल करून अटक केली आहे. या पूर्वीही या आरोपीला सातवर्षीय मुलीचे अपहरण प्रकरणी शिक्षा झाली होती २०१३ मध्ये एका ७ वर्षीय मुलीचे अपहरण केले होते

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या