23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeऔरंगाबादऔरंगाबादेत आज ५९ रुग्ण वाढले, रुग्णसंख्या १०२१ वर

औरंगाबादेत आज ५९ रुग्ण वाढले, रुग्णसंख्या १०२१ वर

एकमत ऑनलाईन

​औरंगाबाद : औरंगाबादेत येथील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज औरंगाबाद येथे नवीन ५९ रुग्ण आढळून आल्याने औरंगाबाद येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता हजारापुढे गेली असून ती आता १०२१ इतकी झाली.

औरंगाबादेत ५९ रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात काेराेनाचा विळखा वाढत चालला आहे. औरंगाबाद शहरात आज ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १०२१ इतकी झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविण्यात आले आहे.

या भागातील आहेत बाधित रूग्ण

औरंगाबाद शहरात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) पैठण गेट, सब्जी मंडी (१), किराडपुरा (१), सेव्हन हिल कॉलनी (१), एन-६ सिडको (१), बायजीपुरा (१), रोशन नगर (१), न्याय नगर (३), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.२ (४), हुसेन कॉलनी (४), पुंडलिक नगर (२), हनुमान नगर (१), संजय नगर, गल्ली नं. पाच (१), हिमायत बाग, एन-१३ ‍सिडको (१), मदनी चौक (२), सादाफ कॉलनी (१), सिल्क मील कॉलनी (८), मकसूद कॉलनी (६), जुना मोंढा (११), भवानी नगर (५), हिमायत बाग, जलाल कॉलनी (३), बेगमपुरा (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये २७ महिला व ३२ पुरुषांचा समावेश आहे.औरंगाबाद येथील सद्यस्थिती
उपचार घेणारे रुग्ण -६६३
बरे झालेले रुग्ण -३२७
एकूण मृत्यू    -३१
एकूण रुग्णसंख्या -१०२१

शनिवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंतच्या १४ तासात ५ बळी

शनिवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंतच्या १४ तासांत या जीवघेण्या आजाराने तब्बल पाच जणांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे शहरात काेराेनामुळे बळींची संख्या ३१ वर गेली आहे. विशेष म्हणजे आजवर ४० वर्षांपुढील शहरातील रुग्णांचेच काेराेनामुळे बळी गेले, मात्र रविवारी पहिल्यांदाच सर्वात कमी वयाच्या म्हणजे ३२ वर्षीय तरुण व ३५ वर्षीय महिला रुग्णाचाही बळी गेला. मृतांमध्ये तीन पुरुष व दाेन महिलांचा समावेश आहे. गेल्या दाेन महिन्यांत गेलेल्या ३१ बळींपैकी २८ जणांचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दिवसभरात ३२ जण कोरोनामुक्त

दरम्यान, रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात ६१ जणांना काेराेनाची लागण झाली यात घाटीतील निवासी डाॅक्टरसह महिला पाेलिसाचा समावेश आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १०२१ झाली. तर दिवसभरात ३२ जण काेराेनामुक्त झाले आहेत.

मृत व्यक्तींचे तपशील

  1. १६ मे सायं. ७.४५ : संजयनगरातील ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू. १३ मे राेजी घाटीत दाखल. १५ मे राेजी पाॅझिटिव्ह. उच्च रक्तदाब, दम्याचाही त्रास.
  2. १६ मे रात्री ९ : जलाल कॉलनी येथील ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू. १५ मे राेजी त्यांना घाटीत दाखल केले हाेते. १६ मे राेजी अहवाल पाॅझिटिव्ह आला. दोन्ही बाजूचा न्यूमाेनिया झाला होता.
  3. १६ मे मध्यरात्री १ वा. : रोशनगेट गल्ली नं. ५ येथील ४२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. १५ मे राेजी त्यांना अॅडमिट केले हाेते, त्याच दिवशी अहवाल पाॅझिटिव्ह. त्यांना मधुमेहाचा त्रास होता.
  4. १७ मे सकाळी ६ वा. : शंभूनगर गल्ली नंबर २९ मधील ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. १३ मे राेजी घाटीत दाखल, त्याच दिवशी पाॅझिटिव्ह. अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम इन केस ऑफ कोविड रेट्रोव्हायरल डिसीजमुळे मृत्यू.
  5. १७ मे सकाळी ९.१५ वा. : बुढीलेनमधील रऊफ कॉलनीतील ७४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. १५ मे राेजी अॅडमिट. याच दिवशी पाॅझिटिव्ह. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रासही हाेता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या