22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयभारतात एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर वाढला

भारतात एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर वाढला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात दिवसेंदिवस बेरोजगारीचे संकट भीषण बनत चालले आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये बेरोजगारी वाढली असून बेरोजगारीचा दर ७.६० टक्क्यांवरून ७.८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या स्वतंत्र थ्ािंक टँकने याबाबतची आकडेवारी जारी केली आहे. सीएमआयईने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सर्वाधिक बेरोजगारीचा दर ३४.५ टक्के हरियाणामध्ये नोंदवला गेला आहे. तर दुस-या क्रमांकावर राजस्थान असून याठिकाणी बेरोजगारीचा दर २८.८ टक्के इतका आहे.

सीएमआयईच्या अहवालानुसार, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात बेरोजगारीचा दर अधिक नोंदला आहे. शहरीभागात मार्चमध्ये बेरोजगारी दर ८.२८ टक्के इतका होता. हा दर एप्रिलमध्ये ९.२ टक्क्यांवर पोहोचला. ग्रामीण भागात रोजगाराची स्थिती बरी असून बेरोजगारीचा दर ७.२९ टक्क्यांवरून ७.१८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

खरेतर, गेल्या आठवड्यात भारताचा विकास दर ६ ते ८ टक्क्यांच्या दरम्यान होता. हा विकास दर अर्थव्यवस्थेत नोक-या निर्माण करण्यासाठी पुरेसा नाही. या संकटावर मात करण्यासाठी सरकारने योग्य तो हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, असे निरीक्षण सीएमआयईच्या तज्ज्ञांकडून नोंदवले आहे.

सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी ब्लूमबर्ग टेलिव्हिजनला सांगितले की, मला वाटते की चांगल्या दर्जाच्या नोक-या निर्माण करण्यासाठी ज्या बाबी आवश्यक असतात. त्या बाबी पुरवण्यात सरकार कमी पडत आहे. पुढे ते म्हणाला की,कोणतीही आर्थिक सुरक्षा नसताना लोक नोक-या सोडत आहेत. चांगल्या दर्जाच्या नोक-या नसल्याने लोकांनी सक्रियपणे नोकरी शोधणे सोडून दिले आहे. तसेच ते कामगार दलातूनही बाहेर पडले आहेत.

सीएमआयईने आपल्या अहवालात पुढे म्हटले की, भारतात कायदेशीर कामाचे वय असणारी ९०० दशलक्ष लोक आहेत. यातील अर्ध्याहून अधिक लोकांना म्हणजेच अमेरिका आणि रशियाच्या लोकसंख्येएवढ्या भारतीय लोकांना नोकरीच नको आहे. २०१७ ते २०२२ दरम्यानच्या पाच वर्षात एकूण श्रम सहभाग दर ४६ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या