24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 19 हजार 100 कोटी रूपये !

लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 19 हजार 100 कोटी रूपये !

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली | 24 मार्च 2020 ते आता या लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गतजवळपास 9.55 कोटी शेतकरी परिवारांना 19,100.77 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे.

जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही तर वेबसाइट pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तपासून पाहू शकता. याठिकाणी लाभार्थ्यांची नवीन यादी अपलोड होत आहे. राज्य/जिल्हा/तालुका/गाव याच्या आधारे तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव तपासून घेऊ शकता.

Read More  पाकिस्तानचा माजी फलंदाज तौफीक उमरला कोरोनाची लागण

या योजनेअंतर्गत फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याशिवाय फायदा घेता येणार नाही. त्याचप्रमाणे 2000 रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी बँक खाते असणे देखील अनिवार्य आहे.

डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. आधार आणि बँक खाते लिंक असणे देखील आवश्यक आहे. याठिकाणी तुम्ही तुमचे एखादे कागदपत्र जोडण्याचे राहून गेले असेल तर ते ऑनलाइन अपलोड करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही योजनेसाठी ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला मदत व्हावी याकरता वार्षिक 6000 रुपये पाठवण्यात येतात. तीन महिन्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये पाठवले जातात.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या