लोहारा : तालुक्यात पहिला रुग्ण धानुरी येथे सापडला होता त्यानंतर २० मे च्या पहाटे जेवळी येथे दुसरा रुग्ण सापडला. त्यापाठोपाठ जेवळी गावातच कोरोना बाधित रुग्णाची पत्नी, भाच्चा, मेहुणा व १४ वर्षाची भाच्ची कोरोना बाधित आढळून आले. यामुळे लोहारा तालुक्यात भीतीचे वातावरण निश्यित आहे. मात्र अनेक नागरिकांनी त्यांची गांभीर्यता असल्याचे दिसून येत नाही.
लोहारा तालुका ग्रीन झोनमधेच होता परंतु जेवळी गावात नव्याने पाच कोरोना बाधित आढळून आल्याने स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. लोहारा तालुक्यातील जेवळी गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असल्याने आरोग्य विभागासह पोलीस प्रशासन सतर्क झाले असले तरी गावोगावी बाहेरून नागरिकांची येजा करण्याची वर्दळ चालूच आहे. यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये असताना आता रेड झोनमध्ये येण्याची नामुष्की आली आहे. सध्या स्थलांतरित नागरिकांचा लोंढा आपल्या मूळगावी परतत आहेत.
बाहेरून येणारे नागरीक सवयंस्फूर्तीने कोरोंटाईन होत नाहीत. यामुळे ग्रामीण भागात अडचण होत असून अनेकवेळा शेजा-यांनाच संबंधित अधिका-यांना माहिती द्यावी. लागते आणि ब-याचवेळी रोषही अंगावर घ्यावा लागत आहे. नागरिकांच्या आडमुटी धोरणामुळे संसर्ग प्रसार होत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार नागरीक प्रतिसाद देत नसल्यामुळे अनेक सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी उफाळून येत आहे. यामुळे स्वतःच्या चुकीमुळे घरातील सदस्यांना आणि गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा विषया बाबत चिंता होत आहे. कोरोनाचे संकट सहजासहजी संपुष्टात येत नाही यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळत दैनंदिन कामकाज केले पाहिजे. तेव्हांच कोरोनाला हरवता येईल अन्यथा या महामारीच्या थैमानात अनेक निष्पापाना जीव गमवावा लागेल. यासाठी स्वतःची काळजी घेत आपल्यामुळे इतरांना धोका होणार नाही व प्रत्येकांनी कोरोनासोबत लढण्याची सवय पाडण्याची गरज आहे.
मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच अदा करावीः मुख्याधिकारी शिंदे
मुस्लिम समाजाचे पवित्र रमजान निमित ईद उल फित्र नमाज अदा करण्यासाठी चंद्रावर अवलंबून आहे. आणि देशात कोरोना हे संसर्ग आजारामुळे शासनाच्या निर्देशानुसार मुस्लिम बांधवानी नमाज घरीच अदा करावे. सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळावे आपली व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्यावी जेणे करून आपल्यामुळे इतरांनाही त्रास होऊ नये. यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी केले.