मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील २४ तासात राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७५२४ इतकी झाली आहे त्यात काळ १६०२ नविन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. २४ तासात ५१२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २०४४१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मुंबई २४ तासात ९९८ नवीन कोरोना रुग्णांची आणि २५ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत मुंबईमध्ये एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या १६५७९ इतकी झाली आहे. मुंबईमध्ये मृतांचा आकडा हा ६२१ वर पोहोचला आहे असून २४ तासात एकूण ४४३ लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे आजपर्यंत ४२३४ रुग्णांना सोडण्यात आले आहे.
Read More जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना तपासणी करुनच एण्ट्री
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ४० हजार १४५ नमुन्यांपैकी. २ लाख १२ हजार ६२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. राजेश टोपे यांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात ३ लाख १५ हजार ६८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, १५ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
२४ तासात राज्यात ४४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे मृतांची एकूण संख्या १०१९ झाली आहे. राज्यात मुंबई हे कोरोना विषाणू बाबत सर्वात बाधित शहर असून, इथल्या धारावी झोपडपट्टीमधील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धारावीत आज ३३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या १०६१ वर पोहोचली आहे. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४२ वर पोहचली आहे.
The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 27524. Today, newly 1602 patients have been identified as positive. Also newly 512 patients have been cured today, totally 6059 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 20441
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 14, 2020