23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रराजकारणात योग्यवेळी योग्य घाव मारावा लागतो

राजकारणात योग्यवेळी योग्य घाव मारावा लागतो

एकमत ऑनलाईन

मुंबई : जे उशिरा आले त्यांना पहिल्या रांगेत बसवले. असे विधान मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले. बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. नंदनवन बंगल्यावर झालेल्या या भेटीनंतर बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण नाराज असल्याची कबुली दिली.

धोका देणा-यांचे राज्य असून, धोका देईल तोच मोठा नेता असून त्याला मंत्रीपद मिळते असे उपहासात्मक भाष्यही त्यांनी केले होते. यानंतर घेतलेल्या मुलाखतीत बच्चू कडू म्हणाले, ५० वर्षांच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. मीही २० वर्षांपूर्वी बंड (शिवसेना) केले होते. जर माझ्याकडून बंड झाले नसते तर, बच्चू कडू राहिला नसता, कोणत्या निवडणुकीत निवडून आला नसता. त्यामुळे राजकारणात ‘जो जिता वही सिंकदर’ हा नियम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

बच्चू कडू पुढे म्हणाले, राजकारण स्वत:साठी नाही, तर सर्वसामान्य जनतेसाठी करायला हवं. त्यामुळं योग्यवेळी योग्य घाव मारावा लागतो. हे बंड जनतेसाठी केले आहे. राजकारणात घरी बसून चालत नाही, असंही ते म्हणाले. मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून योग्यवेळी सन्मान होईल.

आता मंत्रिमंडळ विस्तार झाला असून चर्चा करण्यात काही अर्थ नाहीय. मला (मंत्रिमंडळ) पहिल्या पंगतीत बसवलं असतं तर माझा सन्मान वाढला असता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. संजय राठोडांबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, राठोडांविरुध्द आरोप सिध्द झाले तर विरोधाला अर्थ आहे, असे त्यांनी म्हटले. आम्ही मुद्यासाठी राजकारण करतो, हुद्यासाठी नाही, असेही ते म्हणाले.

जो उशिरा आला त्याला पहिल्या पंगतीत बसवले आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसवले आहे. पण, याची काही नाराजी नाही. राजकारणात असे चालू राहते. आम्ही तितके समजूतदार आहोत. फक्त मंत्रिपदासाठी आम्ही गेलो नव्हतो. फक्त मंत्री आहे म्हणून बच्चू कडू नाही. मंत्रीपदापेक्षा बच्चू कडू जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे याचे जास्त दु:ख नाही, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या