34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeआंतरराष्ट्रीयरशियात ‘या’ महिन्यात डॉक्टर, शिक्षकांना मिळणार कोरोना लसीचा पहिला डोस

रशियात ‘या’ महिन्यात डॉक्टर, शिक्षकांना मिळणार कोरोना लसीचा पहिला डोस

एकमत ऑनलाईन

मास्को : रशियाने कोरोना व्हायरसविरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली होती. रशियाने येत्या आॅक्टोंबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याच महिन्यात १० तारखेपर्यंत लसीची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राधान्यक्रम ठरवताना डॉक्टर आणि शिक्षकांना या लसीचा पहिला डोस देण्यात येईल अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली.

गेमली इंस्टिट्यूट आॅफ अ­ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून, रजिस्ट्रेशनसाठी पेपरवर्क सुरु आहे असे रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्कोव यांनी सांगितले.
लसीच्या सर्व क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या आहेत, असे मुराश्कोव पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आठवड्याभरात लसीकरण सुरु होईल. नियमानुसार या लसीच्या चाचण्या झाल्या असून कुठेही संशोधनाचा कालावधी कमी केलेला नाही असे रशियन संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

गेमली इंस्टिट्यूट आॅफ अ­ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरु केल्या होत्या. मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे हाच या चाचणीमागचा हेतू होता आणि तो साध्य झाला आहे असे अलेक्झँडर लुकाशेव यांनी सांगितले. कोरोना विरोधात वापरण्यासाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे लुकाशेव यांनी स्पुटनिकला सांगितले.

Read More  पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रक्षाबंधनाच्या दिल्या देशवासियांना शुभेच्छा !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या