16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रअंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्येच जुंपली

अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्येच जुंपली

एकमत ऑनलाईन

मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसने अंधेरी पोटनिवडणुकीकरता शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असला तरी मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसची वोट बँक शिवसेनेकडे वळली तर आगामी बीएमसी निवडणुकीत फटका बसण्याची भीती काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.

काँग्रेसने अंधेरी पोटनिवडणुकीकरता शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असला तरी मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस शिवसेनेला मदत करणार असली तर आगामी बीएमसी निवडणुकीत शिवसेना काँग्रेसला मदत करणार का? असाही सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला असताना मुंबई महानगरपलिका निवडणुकीअगोदर काँग्रेसला वोट बँक मजबूत करण्याची संधी असताना शिवसेनेला मदत का? असाही प्रश्न आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र, स्थानिक काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, मुंबईतील काही काँग्रेस नेते हे वेगळ्या मतप्रवाहाचे आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या