22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूर४ वर्षांच्या मुलाच्या अन्ननलिकेत अडकलेले २ बंदे काढण्यात यश

४ वर्षांच्या मुलाच्या अन्ननलिकेत अडकलेले २ बंदे काढण्यात यश

एकमत ऑनलाईन

उदगीर : चार वर्षांच्या मुलाने एक रुपयाचे दोन बंदे एकाच वेळी गिळले आणि ते अन्ननलिकेत अडकले. त्याला गिळायला त्रास व्हायला लागला. तसेच तोंडातून एकसारखी लाळ यायला लागली. त्यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी तात्काळ दवाखान्यात नेले. त्यावेळी एक्स रे केल्यावर त्याने बंदा गिळल्याचे निष्पन्न झाले. पण एक्स रेमध्ये एकमेकाला चिकटलेले दोन बंदे आढळून आले. डॉ. संजय कुलकर्णी यांच्या प्रयत्नांतून हे दोन्ही बंदे काढण्यात यश आले.

आमच्या मुलाने दोन बंदे गिळले आहेत, या पालकांच्या सांगण्यावर एक्स रे पाहून विश्वास ठेवणे अशक्य होते. कारण ते दोन्ही बंदे एकमेकाला चिकटलेले होते. मात्र, दुर्बिणीतून काढताना काळजीपूर्वक सगळे हाताळले आणि एक रुपयाचे दोन बंदे त्या ४ वर्षांच्या मुलाच्या अन्ननलिकेतून काढले. गेल्या २६ वर्षांच्या काळात कान, नाक, घसा तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतानाच्या प्रवासात असा अनुभव पहिल्यांदाच आल्याचे डॉ. संजय शेषराव कुलकर्णी यांनी सांगितले. याआधी अशी बरीच ऑपरेशन्स त्यांनी केली असून सगळ्यात लहान वयाचा अशा प्रकारचा पेशंट ६ महिन्यांचा होता, तर सगळयात वयस्क पेशंट ७५ वर्षांचा होता. डॉ. धनराज मुळे यांनी भूलतज्ज्ञ म्हणून आपले कर्तव्य पार पाडले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या