26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रआजपासून काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत

आजपासून काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत

एकमत ऑनलाईन

मुंबई : आमचं आता एक पात्र संपलं असून, आता विरोधकांचं पात्र सुरु झालं आहे. पुढील रणनिती काय असणार याबाबत आम्ही आमदारांसोबत चर्चा करणार आहोत. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस कायम काम करणार आहे.

काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत, त्यांना शुभेच्छा असल्याचेही पटोले यावेळी म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. त्यानंतर काँग्रेसचा पुढचा काय प्लॅन असणार? पुढची वाटचाल कशी करायची याबाबत काँग्रेसची महत्वाची बैठक आज आयोजीत करण्यात आली आहे. याबाबतची माहिती नाना पटोले यांनी दिली. जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम काँग्रेस कायम करणार असल्याचे पटोले म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे
काँग्रेसमध्ये नाराजीचं काही कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा आधीच निर्णय झाला होता असेही पटोले यांनी सांगितले. त्यादृष्टीने आमची तयारी सुरु आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीनं जनतेचे प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली आहे. चांगले काम आमच्या सरकारनं केली आहे.

विरोधी पक्ष म्हणून आमच्या अजेंड्यावर खूप सारे प्रश्न आहेत. शेतक-यांचे मोठे प्रश्न समोर आहेत. केंद्र सरकारकडून नाफेडच्या माध्यमातून जो चना खरेदी केली जातो तो खरेदी केला नाही. त्यामुळं शेतकरी अडचणीत आहे. दुबार पेरमीचं सकंट शेतक-यावर आलं आहे. ओबीसींचे प्रश्न आहेत. बेरोजगारीचे प्रश्न आहेत. त्यावर आम्ही काम करणार असल्याचे पटोले म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या