25.6 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeएसटी कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात; वेतन थकीत असल्याने व्यक्त केला संताप

एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात; वेतन थकीत असल्याने व्यक्त केला संताप

एकमत ऑनलाईन

मुंबई : एसटी महामंडळाने मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील अनेक कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन थकीत असल्याने कर्मचाऱ्यांनावर उपाशी राहण्याची पाळी आली आहे. मात्र, एसटी महामंडळाला आतापर्यंत जाग आलेली नाही. लॉकडाऊन काळात कामावर गैरहजर राहणाऱ्या कामगारांवर निलंबनाची कारवाई करू नये, तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत ठेवून नयेत, असे आदेश असताना सुद्धा एसटीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिन्ही विभागाच्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत ठेवले आले. मात्र, मध्यवर्ती कार्यालयातील अधिकाऱ्यांना पूर्ण पगार देण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारी चांगलाच संताप व्यक्त करत एसटी महामंडळाविरोधात आंदोलनचा इशारा दिला आहे.

Read More  मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणात कायदेशीर अडचणी

गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील एसटीचे चाक कोरोनामुळे थांबले होते. मात्र, कोरोना विषाणूविरोधात लढाईत अत्यावश्यक सेवेकरिता कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातून कर्तव्यावर येण्यासाठी व त्यांनतर पुन्हा घरी जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बसेस अत्यावश्यक सेवा म्हणून चालविण्यात येत आहे. या तिन्ही विभागातील काही चालक व वाहकांना जितके दिवस कामावर हजर होते, तितक्याच दिवसांचे वेतन एसटी महामंडळाने दिले आहे. याउलट संपूर्ण महिना गैरहजर असलेल्या मध्यवर्ती कार्यालयातील अधिकाऱ्यांना पूर्ण पगार देण्यात आला आहे.

तसेच राज्यातील इतर आगार व विभागांमधील कर्मचाऱ्यांना एसटीची सेवा बंद असताना पूर्ण महिन्याचा पगार देण्यात आला. त्यामुळे जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची मागणी केली आहे. मात्र यावर एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी अडचणीत सापडले असून या संकटकाळात आर्थिक चनचन सुद्धा त्यांना भासत आहे. कुटूंबियांच्या उदरनिर्वाह कसा करायचा असा मोठा प्रश्न त्यांच्यावर आलेला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या