23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीययोगी सरकारमध्ये नाराजीनाट्य २ बडे नेते शहांकडे करणार तक्रार

योगी सरकारमध्ये नाराजीनाट्य २ बडे नेते शहांकडे करणार तक्रार

एकमत ऑनलाईन

लखनौ : मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून राजकारण रंगत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सलग दुस-यांदा उत्तर प्रदेशात सत्ता मिळवली आहे. मात्र आता काही राजकीय कारणांमुळे योगी सरकारच्या मंत्रिमंडळातील नाराजीनाट्य समोर आले आहे.

काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले जितीन प्रसाद आणि दिनेश खाटीक हे मंत्री योगी सरकारच्या कारभारावर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. दिनेश खाटीक हे जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री असून ते आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. पण योगींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. आपल्या आदेशाचे अधिका-यांकडून पालन होत नसल्याने खाटीक नाराज असून स्वतंत्र देव सिंह हे या विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत.

दरम्यान, दोन्ही मंत्र्यांचा फोन मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बंद येत होता. या महिन्याच्या सुरूवातीला योगी सरकारने प्रसाद यांच्या विभागाची झाडाझडती घेतली आहे. तीन सदस्यांच्या समितीने विभागातली बदल्यांमध्ये अनियमितता असल्याचा अहवाल दिला आहे. त्याचा ठपका पांडे यांच्यावर ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. या बदलीच्या पार्श्वभूमीवर जितीन प्रसाद हे बुधवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या