26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रअडीच वर्षांत राज्यात ६,५८९ शेतक-यांच्या आत्महत्या

अडीच वर्षांत राज्यात ६,५८९ शेतक-यांच्या आत्महत्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : अतिवृष्टीचा तडाखा, शेतमालाला भाव नाही, सरकारकडूनही पुरेशी मदत नाही या सर्व परिस्थितीत शेतकरी हतबल झालेला दिसून येत आहे. त्यात कोरोना काळात शेतक-यांच्या वाट्याला नको ते आलं. अशात मुलांचे शिक्षण, बँका आणि खाजगी कर्ज याच शेतकरी गुरफटून गेला. आणि अशात मग अनेक शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला.

मागील अडीच वर्षांत राज्यातील तब्बल ६,५८९ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. या संदर्भात मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिली.

अडीच वर्षांत राज्यातील ६,५८९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आकडा खूप धक्कादायक आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सरकारच्या सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, अशी सोय करण्याचा निर्णय झाला. पण, पुढे काही झाले नाही.

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात झाल्या आहेत. अडीच वर्षांत त्याठिकाणी दोन हजार ८०१ तर औरंगाबाद विभागातही दोन हजारांहून अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली. सुदैवाने जानेवारी २०२० ते जून २०२२ या अडीच वर्षांत कोकण विभागात एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सरकारकडून दोन-तीन लाखांची मदत मिळते. पण, मदत देण्याआधी आत्महत्येची कारणे, तो शेतकरी होता का, अशा विविध कारणांची पडताळणी केली जाते. अडीच वर्षांत ६,५८९ शेतक-यांपैकी १,७०० कुटुंबांना मदत मिळालेली नाही.

हतबल बळिराजाकडून खासगी सावकारांनी व्याजाने दिलेल्या रकमेपोटी जमिनी बळकावल्याच्या तक्रारी वाढत आहेत. महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत जिल्हा उपनिबंधकांनी (डीडीआर) गेल्या १४ वर्षांत १,३०९ एकर जमीन ८२९ शेतक-यांना परत मिळवून दिली आहे. जमिनी बळकावल्याच्या ८,३७७ तक्रारी आठ वर्षांत सहकार आयुक्तालयाकडे दाखल झाल्या आहेत. त्यातील ३९३ सावकारांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या